वीजकपातीचा औद्योगिकनगरीला फटका !

April 20, 2012 5:09 PM0 commentsViews: 6

20 एप्रिल

आजघडीला महाराष्ट्रामध्ये दोन हजार मेगावॅट विजेचा तुटवडा आहे. या वीजटंचाईचा फटका राज्यातल्या उद्योगांना आणि शेतीलाही बसतोय. पुण्याजवळच्या पिंपरी चिंचवडध्ये आशियातला सर्वात मोठा वाहन उद्योग विस्तारला. पण या औद्योगिक जिल्ह्याला एक मोठा प्रश्न सतावतोय आणि तो म्हणजे विजेच्या टंचाईचा. गाड्यांच्या इंजिनचे पार्ट्स बनवताना तांबं आणि पितळ वितळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात वीज लागते. पण इथल्या सुमारे आठ हजार लघुउद्योगांना वर्षभर वीजकपातीला सामोरं जावं लागतंय आणि यामुळे प्रचंड नुकसान होतंय.

आम्हाला कोणतीही पूर्वसूचना दिल्याशिवाय ते वीज कापतात. आणि त्यामुळे जास्त नुकसान होतं. इथल्या मोठ्या उद्योगांसाठी सततचा वीज पुरवणारे फीडर्स आहेत पण याच उद्योगांना पुरवठा करणार्‍या लघुउद्योगांना मात्र आठवड्यातून एकदा वीजकपात सोसावी लागतेय आणि त्याचा फटका अर्थातच मोठ्या उद्योगांनाही बसतोच.

1500 ते 2000 मेगावॅट वीजतुटवडा मागणी – 15 हजार मेगावॅटपुरवठा – 13 हजार 500 मेगावॅटवीजचोरी आणि तांत्रिक कारणांमुळे 50 टक्के वीज वाया

पिंपरी चिंचवडसारख्या शहरांमध्ये वीजतुटवडा चांगलाच जाणवतोय पण मराठवाड्यातल्या सुमारे 8 जिल्ह्यांच्या तुलनेत तो काहीच नाही, असंच म्हणायची पाळी येते. कारण इथल्या ग्रामीण आणि निमशहरी भागांमध्ये सरासरी 12-13 तास लोड शेडिंग असतं.

इथल्या शेतीच्या भागातला अंधार तर कित्येक वर्षं फिटलेला नाही. लातूरमधल्या या धान्याच्या गिरण्यांमध्ये रात्रीच काम होतं. आणि त्यामुळे त्यांचंही अतोनात नुकसान होतंय. जी वीज मिळतेय तीही तुटपुंजी आहे. राज्याच्या वीज निमिर्ती करणार्‍या महाजनको ने दिलेल्या माहितीनुसार, शेतकर्‍यांकडे 6000 हजार कोटींची थकबाकी आहे. आता या कर्जवसुलीत शेतकर्‍यांना व्याजात सूट देण्यासाठी ऍम्नेस्टी इंटरनॅशनलची योजना सुरू करण्यात आली आहे. पण तरीही यावर उपाय निघत नाही. रत्नागिरी आणि उरणमधल्या वीजनिमिर्ती केंद्रात क्षमतेपेक्षा निम्मीच वीज तयार होतेय.

रत्नागिरी वीजक्षेत्रक्षमता 1950 मेगावॅटवीजनिमिर्ती – 100 मेगावॅट

उरण वीजकेंद्रक्षमता – 850 मेगावॅटवीजनिमिर्ती – 400 मेगावॅट

जूनपर्यंत 3 नवे वीजप्रकल्पक्षमता – 1500 मेगावॅट

राज्याला डिसेंबरपर्यंत लोडशेडिंगमुक्त करण्याचा महाजनकोचा दावा आहे. पण या दाव्यात किती तथ्य आहे याची मात्र सगळ्यांनाच शंका येतेय.

close