सुवर्णगणेश मूर्ती चोरीप्रकरणी 7 संशयित ताब्यात

April 21, 2012 7:01 AM0 commentsViews: 1

21 एप्रिल

दिवेआगारच्या सुवर्णगणेश मूर्ती चोरी प्रकरणी सात जणांना औरंगाबादमधून ताब्यात घेण्यात आलं आहे. औरंगाबादमधल्या गंगापूर तालुक्यातल्या पकोरा वस्तीवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. औरंगाबाद आणि रायगड पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली आहे.गेल्या महिन्याभरापासून पोलिसांना जंग-जंग पछाडून अखेर हे यश हाती लागले आहे. याप्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेजमध्ये कैद झालेल्या चोरांचे फोटो प्रसिध्द केले होते याचाच धागा पकडून ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान कालच, दिवेआगारच्या सुवर्णगणेश मूर्ती प्रकरणी विधानसभेत महाआरती करणार्‍या शिवसेना-भाजपच्या 14 आमदारांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे. सभागृहाची शिस्त पाळणार या अटीवर आज 14 निलंबित आमदारांचं निलंबन मागे घेण्यात आले आहे. यात शिवसेनेच्या 13 आणि भाजपच्या 1 आमदाराचा समावेश आहे.

close