ममतादीदी सुरू करणार टीव्ही चॅनेल, वर्तमानपत्र

April 21, 2012 3:44 PM0 commentsViews: 10

21 एप्रिल

पश्चिम बंगाल सरकार स्वतःचं टीव्ही चॅनेल आणि वर्तमानपत्र सुरू करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री ममता बॅनजीर्ंनी केली आहे. या टीव्ही चॅनेल आणि वर्तमानपत्रातून सरकारचे निर्णय आणि त्याच्या यशस्वी योजनांच्या बातम्या देण्यात येतील. काही विशिष्ट टीव्ही चॅनल्स आणि वर्तमानपत्रं आपल्या सरकारची वाईट प्रतिमा रंगवत असल्याचा आरोप ममतांनी केला आहे. त्यांचा सामना करण्यासाठी ममता राज्य सरकारचं स्वतःचं चॅनल सुरू करणार आहेत. सरकारनं गेल्या काही महिन्यात घेतलेल्या निर्णयांची पुस्तिकाही प्रसिद्ध करण्याची ममतांची योजना आहे.

close