पुणे विद्यापीठात ‘पाणी’बाणी, विद्यार्थ्यांचे हाल

April 21, 2012 7:22 AM0 commentsViews: 1

21 एप्रिल

पुण्यातल्या पाणी टंचाईचा फटका आता पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनाही बसलाय. ऐन परीक्षेच्या तोंडावर विद्यापीठातील मुलांच्या हॉस्टेलमध्ये पाणी येत नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. विद्यापीठाच्या हॉस्टेलमधले विद्यार्थी पाण्यासाठी पायपीट करत आहेत. वसतीगृहात पिण्याचे पाणी तर दूरच आंघोळीसाठी आणि टॉयलेटमध्येही पाणी नाही. ऐन परीक्षेच्या तोंडावर विद्यार्थ्यांना पाण्यासाठीच परीक्षा देण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाचा निषेध केला आहे.

close