मुख्यमंत्र्यांनी घेतली सोनिया गांधींची भेट

April 21, 2012 7:30 AM0 commentsViews: 2

21 एप्रिल

पाच महापालिकेत काँग्रेसने मिळालेलं यश आणि पक्षात सुरु असलेल्या 'शीतयुध्द' याबाबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज दिल्ली दरबारी दाखल झाले आहे. त्यांनी काहीवेळापूर्वी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली आणि सध्याच्या राजकीय स्थितीवर चर्चाही केली. राज्यात कॅगचा अहवाल फुटल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांवर ठपका ठेवण्यात आला होता. तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेबाबतही मुख्यमंत्र्यांनी माहिती दिल्याची शक्यता आहे.

close