चेन्नईचा ‘सुपर रॉयल’ विजय

April 21, 2012 3:52 PM0 commentsViews: 1

21 एप्रिल

शेवटच्या बॉलपर्यंत रंगलेल्या मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्जने राजस्थान रॉयल्सचा 7 विकेट राखून पराभव केला आहे. शेवटच्या बॉलवर चेन्नईला विजयासाठी 2 रन्सची गरज असताना कॅप्टन धोणीनं स्टुअर्ट बिन्नीच्या बॉलिंगवर 2 रन्स वसूल केले आणि टीमला शानदार विजय मिळवून दिला. राजस्थान रॉयल्सने चेन्नईसमोर विजयासाठी 146 रन्सचं आव्हान ठेवलं होतं. ओवेश शहाने हाफसेंच्युरी करत टीमला समाधानकारक स्कोर उभा करुन दिला. त्याला राहुल द्रविड आणि मनेरियाची चांगली साथ मिळाली. पण याला उत्तर देणार्‍या चेन्नईची सुरुवात खराब झाली. बद्रीनाथ आणि रैना झटपट आऊट झाले. पण ड्यू प्लेसिसने एकाकी झुंज देत टीमला विजयाच्या मार्गावर आणलं. तर कॅप्टन धोणीनं नॉटआऊट खेळी करत टीमच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

close