नितीन गडकरी बाळासाहेबांच्या भेटीला

April 21, 2012 8:00 AM0 commentsViews: 4

21 एप्रिल

भाजपाध्यक्ष नितीन गडकरी यांनी शुक्रवारी रात्री मातोश्रीवर जाऊन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची भेट घेतली. काही दिवसांपूर्वी नितीन गडकरी यांचा फोन बाळासाहेबांपर्यंत पोचत नसल्यामुळे गडकरींनी नाराजी व्यक्त केली होती. गडकरींच्या नाराजीमुळे युतीत 'नेटवर्क' न मिळण्याच्या समस्या उद्भावल्या होत्या. यामुळे भाजपनेते गोपीनाथ मुंडे, सुधिर मुनगंटीवार यांनी मात्रोश्रीवर जाऊन 'लाईन ऑल क्लिअर' करुन घेतली. पण 'नेटवर्क जाम' होण्याची समस्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गडकरींवर केलेल्या टीकेमुळे निर्माण झाली होती. पणभाजपच्या शिलेदारांच्या भेटीनंतर सर्व काही ठीक झाले. शिवसेनाप्रमुख आणि गडकरींची भेट मार्च महिन्यात होणार होती पण अखेर काल रात्री गडकरी यांनी भेट घेतील. बाळासाहेब ठाकरे यांच्याशी आपले नाते राजकारणापलीकडे आहे. त्यांच्याशी आज मनसोक्त गप्प झाल्यात मध्यंतरी निवडणुका असल्यामुळे भेट होऊ शकली नाही पण बाळासाहेबांच्या भेटीमुळे मी आनंदी झालो अशी प्रतिक्रिया गडकरी यांनी दिली.

close