चहा होणार राष्ट्रीय पेय

April 21, 2012 10:21 PM0 commentsViews: 21

22 एप्रिल

'गरमागरम..चहा..'रोज सकाळची सुरवात ताजेतवानी आणि गोड करणाऱ्या चहाला लवकरच राष्ट्रीय पेय म्हणून घोषित करण्यात येणार आहे. अशी घोषणा नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष माँटेकसिंग अहुलवालिया यांनी केली.रोजच्या कामाचा तणाव, आनंदाच्या क्षणी 'एक कटिंग चहा'चा आस्वाद आपण रोजच घेतो. गेल्या कित्येक वर्षापासून जपत आलेलीही सवय आता राष्ट्रीय पेय म्हणून घोषित होणार आहे. आज देशाच्या कानाकोपऱ्यात सहज आणि कमी किमती चहा उपलब्ध होते. घरापासून ते कॅालेजचा कट्टा, आफिस ते मिंटिग किंवा पाहण्याचा कार्यक्रम असो या सगळ्यांचीच गोड सुरुवात होते ती चहामुळेच. त्यामुळे पुढील वर्षी 17 एप्रिलला चहाला राष्ट्रीय पेय म्हणून घोषित करण्यात येणार आहे. चहाचा पहिला मळा लावणारे मणिरम देवन यांच्या 212 व्या जयंती निमित्त ही घोषणा करण्यात येणार आहे असं अहुलवालिया यांनी सांगितले.

close