टीम अण्णांमधून काझमींची हकालपट्टी

April 21, 2012 11:48 PM0 commentsViews: 4

22 एप्रिल

टीम अण्णांमध्ये पुन्हा एकदा फूट पडली आहे. आंदोलनाच्या सुरवातीपासून सोबत असलेले मुख्य सदस्य मुफ्ती शमीम काझमींची हकालपट्टी करण्यात आली आहे. आज दिल्लीत झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. काझमी यांनी बैठकीत अॅाडिओ रेकॅार्डिंग करत असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

सुत्रानी दिलेल्या माहितीनुसार काझमी आजच्या बैठकीत मोबाईल फोनवर गुप्तपणे अॅाडिओ रेकॅार्डिंग करत होते. याचवेळी बैठकीत बसलेल्या सदस्यांना संशय आल्यानंतर त्यांना एका दुसऱ्या रुममध्ये नेऊन त्यांचा मोबाईल तपासला असता हा प्रकार समोर आला.त्यामुळे त्यांना शांती भूषण यांनी काही दिवस बाहेर राहण्याचे सांगितले. घडलेल्या प्रकाराबाबत उत्तर देणे मात्र काजमी यांनी टाळले. यानंतर टीम अण्णांने हे अॅाडिओ रेकॅार्डिंग डिलिट केले. आणि आझमी यांना हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. या अगोदर काझमी यांनी अण्णा हजारे यांच्याशी चर्चा केली. तसेच टीम अण्णांनी केलेले आरोप आझमी यांनी फेटाळून लावले.

close