पुण्यात हेल्मेट सक्तीविरोधात आंदोलनाचा इशारा

April 21, 2012 6:34 AM0 commentsViews: 5

21 एप्रिल

पुण्यामध्ये हेल्मेट सक्ती केली तर आंदोलन करु असा इशारा पुण्याच्या हेल्मेट विरोधी संघटनेनं दिला आहे. पुण्यामध्ये सध्या जर इतर कोणत्याही चुकीसाठी ट्रफिक पोलिसांनी पकडलं तर दंड आकारताना हेल्मेट न घालण्यासाठीचा दंडही आकारला जातोय. नियमांनुसारच ही कारवाई केली जात असल्याचे वाहतूक पोलिसांचं म्हणणं आहे. त्या माध्यमातून पुण्यामध्ये एकप्रकारची हेल्मेट सक्तीच पोलीस करत असल्याची भावना पुणेकरांनी व्यक्त केली आहे.याविरोधात एकत्र येत एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामध्ये ही कारवाई अशीच होत राहिली तर संपूर्ण पुण्यामध्ये पुन्हा एकदा तीव्र आंदोलन पुकारलं जाईल असं हेल्मेट विरोधी संघटनेतर्फे सांगण्यात आलंय.

close