बाबा रामदेवांना सोबत घेणारच- अण्णा

April 23, 2012 12:36 PM0 commentsViews: 1

23 एप्रिल

भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात बाबा रामदेव यांना सोबत घेण्यावरुन टीम अण्णांमध्ये असलेले मतभेद आता उघड झाले आहे. बाबा रामदेव यांना सोबत घेतल्यास टीम अण्णांना काही प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील असं सांगत मेधा पाटकर यांनी काल आपली नाराजी जाहीर केली होती. पण बाबा रामदेव यांना सोबत घेणारच असं खुद्द अण्णा हजारे यांनी आज स्पष्ट केलंय. तसेच टीम अण्णांमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचा दावाही अण्णांनी केला आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

काल नोएडा येथे कोअर कमिटीच्या बैठकीत घडलेल्या नाट्यामुळे मुफ्ती शमीम आझमी यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. बाबा रामदेव आणि अण्णा हजारे यांनी 1 मेपासून देशभरासह राज्यभरात लोकपाल विधेयक आणि सक्षम लोकायुक्तसाठी हा दौरा करणार आहे. मात्र, बाबा रामदेव यांच्या सहभागामुळे टीम अण्णांच्या सदस्यांनी आक्षेप घेतला आहे. यासाठी काल कोअर कमिटीमध्ये चर्चा झाली पण बाबांचा विरोध कायम राहिला. तर आज अण्णा हजारे यांनी बाबा रामदेव आंदोलनात सोबतच राहतील असं जाहीर केलं आहे. त्यामुळे टीम अण्णा आता अण्णांच्या निर्णायानंतरही काय भूमिका घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

close