अमेरिकेचं सिटी ग्रुपला 20 अब्ज डॉलर्सचं पॅकेज

November 24, 2008 10:00 AM0 commentsViews: 6

24 नोव्हेंबर, अमेरिका सरकारनं सिटीग्रुपला आर्थिक मदत जाहीर केलीय. या पॅकेजनुसार सिटीग्रुपला वीस अब्ज डॉलर्सची मदत मिळणारेय. या कर्जाची भरपाई म्हणून अमेरिकन सरकारला सिटीग्रुपचे प्रेफर्ड् शेअर्स मिळणार आहेत. तसंच 306 अब्ज डॉलर्स गँरटीदाखल मिळणार आहेत. सिटीग्रुपला भांडवल आणि आवश्यक तो चलनपुरवठा पुरवण्याबाबत सरकार आणि कंपनीत करार झाल्याचं फेडरल रिझर्व्हनं जाहीर केलेल्या पत्रकात म्हटलंय. सिटीग्रुपलाही मंदीचा मोठा फटका बसला असून गेल्या आठवड्यातच कंपनीचा स्टॉक 60 टक्क्यांनी कोसळला होता. कॉस्ट कटिंगचा एक पर्याय म्हणून कंपनी त्यांचे भारतीय वंशाचे सीईओ विक्रम पंडित यांना काढून टाकणार असल्याबाबतही जोरदार चर्चा मार्केटमध्ये होती.

close