पिंपरी-चिंचवड पालिकेकडून गतिमंद मुलांना आर्थिक मदत

April 21, 2012 5:49 AM0 commentsViews: 2

21 एप्रिल

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने एक खास उपक्रम सुरु केला आहे. शहरातील गतिमंद मुलांना दरमहा एक हजार रुपयाची रोख मदत देण्याच्या निर्णय पालिकेच्या स्थायी समितीत नुकताच घेण्यात आला आहे. पालिके च्या या निर्णयाने शहरातील 360 गतिमंद मुलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. पुढच्या वर्षी दुसर्‍या टप्यात या योजनेत शहरातील इतर गतींमद मुलांचा समावेश केला जाणार असल्याचे स्थायी समितीच्या अध्यक्षांनी म्हटलंय. गतिमंद मुलांचा सांभाळ करणा-या पालकांनी या निर्णयाचं स्वागत केलंय.

close