सुहास खामकार ठरला मिस्टर इंडिया 2012

April 21, 2012 9:57 AM0 commentsViews: 18

21 एप्रिल

इंडियन बॉडीबिल्डिंगचा मिस्टर इंडिया 2012 चा किताब महाराष्ट्राच्या सुहास खामकरने पटकावला आहे. इंडियन बॉडीबिल्डिंग ऍन्ड फिटनेस स्पर्धेची काल पुण्यातील सणस ग्राऊंडवर काल रात्री शेवटची फेरी झाली. या स्पर्धेत देशभरातून 400 बॉडीबिल्डर्स सहभागी झाले होते. सुहासनं प्रथम 80 किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आणि नंतर शेवटच्या स्पर्धेत नऊ स्पर्धकांना मागे टाकत मिस्टर इंडिया 2012 चा किताब पटकावला. मिस्टर इंडिया 2012चा किताब जिंकल्यानंतर सुहास खामकरचा पुणेरी पगडी घालून सन्मान करण्यात आला.

close