मुलुंडमध्ये शाळेत बिबट्या घुसला

April 21, 2012 11:29 AM0 commentsViews: 7

21 एप्रिल

मुंबईतील मुलुंड येथील एनईएस शाळेत सकाळी साडेदहाच्या सुमाराला एक बिबट्या घुसल्यामुळे एकच थरकाप उडाला आहे. आज सकाळी साडेदहाच्या सुमाराला शाळेचं बागकाम करण्यार्‍या कर्मचार्‍याने बिबट्या शाळेत घुसल्याचं पाहिलं. सुदैवाने आज शाळेला सुट्टी असल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, बिबट्या शाळेत कोठे लपून बसला आहे याचा शोध घेतला जात आहे. सध्या वनविभागाचे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे . पण अजून बिबट्याला पकडण्यात यश आलं नाहीय.

close