‘पुण्यातील राष्ट्रपतींच्या घराविरुध्द आंदोलन मागे घ्यावे’

April 23, 2012 8:24 AM0 commentsViews: 1

23 एप्रिल

पुण्यातील राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या बंगल्याचं प्रकरण चिघळत चालंलय. राष्ट्रपतींच्या बंगल्याला जागा देण्यास विरोध करणारे निवृत्त कर्नल सुरेश पाटील यांनी आपलं आंदोलन मागे घ्यावं अशी गळ राष्ट्रपतींनी त्रिपुराचे राज्यपाल डी वाय पाटील यांच्यामार्फत घातल्याचे पाटील यांनी म्हटलं आहे. पण पाटील यांनी राष्ट्रपतींची विनंती फेटाळून लावत आंदोलन सुरुचं ठेवणार असल्याचं स्पष्ट केलंय. राष्ट्रपती निवृत्त झाल्यावर त्यांच्यासाठी पुण्यातल्या खडकीत बंगल्याला जागा देण्यात आली. पण नियमापेक्षा जास्त जागा या बंगल्याला देण्यात आल्याचं पाटील यांच म्हणणं आहे.

close