महाराष्ट्र बँकेला प्रशासकांमुळेच शिस्त आली – मुख्यमंत्री

April 21, 2012 12:57 PM0 commentsViews: 3

21 एप्रिल

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेवर नेमलेल्या प्रशासकांमुळेच कारभाराला शिस्त आली आणि त्यामुळेच बँकेला रिझर्व्ह बँकेचा परवाना मिळाला, असा टोला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला. हा परवाना मिळवण्यासाठी 1966 पासून महाराष्ट्र राज्य सहकारी बँक प्रयत्न करत होती. मे 2011 मध्ये नाबार्डच्या शिफारसीनुसार राज्य सरकारने या बँकेचं संचालक मंडळ बरखास्त केलं होतं. बरखास्तीची ही कारवाई म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जोरदार झटका असल्याचं मानलं जात होतं. आता या प्रकरणी एफआयआर दाखल करण्याच्या कोर्टाच्या सूचनेवर विचार सुरु असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

close