अनिल महाबोलेंना कोर्टाचा तात्पुरता दिलासा

April 23, 2012 1:40 PM0 commentsViews: 3

23 एप्रिल

बलात्काराच्या आरोपाखाली निलंबित करण्यात आलेल्या एसीपी महाबोले यांना हायकोर्टाने तात्पुरता दिलासा दिला आहे. महाबोलेंनी पुढील तपासात सहकार्य केलं तर अटक होणार नाही. झालीच तर 30 हजारांच्या जामिनावर सुटका होईल अशी हमी कोर्टाने दिली आहे. पण महाबोलेंना 30 एप्रिलपर्यंत सक्तीची हजेरी लावावी लागणार आहे असंही कोर्टाने स्पष्ट केलं.एसीपी महाबोलेंना मागली आठवड्यात निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्यावर एका महिला इन्सपेक्टरवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडित महिलानेे दिलेल्या तक्रारीत महाबोलेंनी कुर्ल्यातील आपल्या घरी येऊन भूल दिली आणि बलात्कार केला. याप्रकरणाबद्दल महाबोलेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

close