नक्षलवाद्यांनी केलं जिल्हाधिकार्‍यांचे अपहरण

April 21, 2012 1:43 PM0 commentsViews: 1

21 एप्रिल

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी सुखमाच्या जिल्ह्याधिकारी ऍलेक्स पॉल मेनन यांचे अपहरण केल्याची घटना घडली आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या ताफ्यावर नक्षलवाद्यांनी हल्ला केला. जिल्हाधिकार्‍यांचं अपहरण करुन त्यांच्या दोन बॉडीगार्ड्सला ठार मारले. ऍलेक्स पॉल मेनन शेजारी गावातून ग्राम स्वराज अभियान कार्यक्रम आटपून परतत होते. त्यावेळी त्यांच्या ताफ्यावर नक्षलवाद्यांनी हल्ला चढवला. त्यांच्या अपहरणाबद्दल पोलीस दल तपास घेत आहे. मात्र त्यांच्याबद्दल इतर माहिती अजून मिळू शकली नाही. मागिल महिन्यात नक्षलवाद्यांनी एका आमदार आणि दोन इटालियन पर्यटकांचे अपहरण केले होते. ह्या घटना ताज्या असतानाच आज आणखी एक अपहरण नाट्य घडलंय.

close