प्राध्यापकांचा उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार

April 23, 2012 1:44 PM0 commentsViews: 4

23 एप्रिल

राज्यातील दहा विद्यापीठांतील प्राध्यापकांच्या संघटनांनी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला आहेत. सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे दहा महिन्याची थकबाकी आणि महागाई भत्याच्या फरकाची रक्कम देण्याची मागणी या प्राध्यापकांची आहे. महाराष्ट्र फेडरेशन ऑफ युनिर्व्हीसिटी अँड कॉलेज टिचर्स या संघटनेशी संलग्न प्राध्यापक या बहिष्कारात सहभागी आहेत. आंदोलन असंच सुरु राहिल्यास उत्तरपत्रिका तपासणीचं काम रखडून त्याचे परिणाम निकाल लांबण्यावर होईल अशी भीती आहे. दरम्यान, प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना वेठीस धरु नये, प्राध्यापकांच्या मागण्याबद्दल सकारात्मक तोडगा काढण्यासाठी बुधवारी बैठक बोलावली आहे आणि प्राध्यापकांनी उत्तरपत्रिका तपासण्याचं काम ताबडतोब सुरु करावं असं आवाहन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.

close