पाण्यासाठी बुलढाण्यात आमरण उपोषण

November 24, 2008 10:07 AM0 commentsViews: 2

24 नोव्हेंबर, बुलढाणा वान प्रकल्पाचं पाणी बुलडाण्यातील खेड्यांनाही मिळावं, यासाठी ' प्रहार ' संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वान नदीपात्रातच आमरण उपोषण सुरू केलंय. बुलडाणा, अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांच्या सीमारेषेवर शेतीसाठी तसंच पिण्याच्या पाण्यासाठी वान प्रक ल्प उभारण्यात आलाय. अकोला, अमरावतीसारख्या जिल्ह्यातील दीडदोनशे किलोमीटरवरील गावांना पिण्यासाठी पाणी जातं. मात्र अवघ्या 6 किलोमीटर अंतरावर असून सुद्धा बुलडाण्यातील गावांना पाणी मिळत नाही. त्यासाठी प्रहार संघटनेनं हे अभिनव आंदोलन सुरू केलंय.

close