सरकारी कायदा कामगारांच्या विरोधी- शरद राव

April 23, 2012 2:08 PM0 commentsViews: 1

23 एप्रिल

राज्य सरकारच्या अत्यावश्यक सेवा कायद्याला कामगार नेते शरद राव यांनी विरोध केला आहे. सरकारचा कायदा कामगार विरोधी असून संप करणे हा कामगारांचा अधिकार आहे. तो अधिकार सरकार हिरावून घेतं आहे. सरकारने हा कायदा मागे घ्यावा अशी मागणी शरद राव यांनी केली. आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही मागणी केली. मागील आठवड्यात राज्य सरकारने अत्यावश्यक सेवा कायद्याच्या विधेयकाला मंजुरी दिली या कायद्यात संप करून सर्वसामान्य जनतेला त्रास होऊ नये म्हणून संप करणार्‍यांना एका वर्षाच्या तुरुंगवासीची शिक्षा भोगावी लागेल अशी तरतूद करण्यात आली आहे. नागरिकांनी या विधेयकाचे स्वागत केले आहे तर कामगार संघटनांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे.

close