औरंगाबादेत अतिक्रमणावरुन भाजीविक्रेता-पोलिसात धुमश्चक्री

April 23, 2012 7:36 AM0 commentsViews:

23 एप्रिल

औरंगाबादमध्ये अतिक्रमण विरोधी मोहीमेला विरोध करणार्‍या भाजी विक्रेत्यांना पोलिसांनी अमानुष मारहाण केलीय. महापालिकेने औरंगपुरा येथील भाजी मार्केटमध्ये अतिक्र मण मोहिम हाती घेतली. यामध्ये अनेक भाजीविक्रेत्याचे गाळे पोलीस उध्वस्त केली. त्यामुळे संतापलेल्या भाजीविक्रेत्यांनी अतिक्रमण कारवाईचा विरोध केला यावेळी पोलीस आणि भाजीविक्रेत्यांंमध्ये एकच धुमश्चक्री उडाली. पोलिसांनी भाजीविक्रेत्यांवर लाठीचार्ज केला. विरोध करणार्‍या विक्रेत्यांना अमानुष मारहाण केली. यामुळे काही भाजीविक्रेते किरकोळ जखमी झाले असले तरी भाजीविक्रेत्यांचा व्यवसाय उध्दवस्त झाल्यामुळे अनेक कुटुंबांवर मोठं संकट कोसळलंय.

close