दिन सोन्याचा, मुहूर्त खरेदीचा !

April 24, 2012 12:04 PM0 commentsViews: 10

24 एप्रिल

आज अक्षय तृतीया..साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त…आजच्या सोनं खरेदी करण्याचा दिवस असतो. आज देशभरातील सराफ बाजारात ग्राहकांनी एकच गर्दी केली आहे. यंदाच्या वर्षी सोन्याचे भाव गगणाला भिडले असले तरी मुहूर्त न टाळता ग्राहकांनी थोड फार का होईना सोनं खरेदी करण्याचा घाट घातलाय. आज मुंबईसह महाराष्ट्रात प्रतितोळे सोन्याचा दर 29 हजार 500 इतका आहे. तर दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या प्रतितोळ्याला 29 हजार 500 इतका दर आहे. तसेच काही दिवसांपुर्वी सराफांनी देशव्यापी संप पुकारला होता. तब्बल 21 दिवस हा संप चालला. 21 दिवस बाजारपेठ बंद असल्यामुळे अक्षयतृतीया मुहूर्त साधून ग्राहक जास्त सोनं खरेदी करतील असा विश्वास सराफांनी व्यक्त केला. सोने खरेदीबरोबरच आज वाहन खरेदीसाठी ग्राहकांनी मोठी सोन्यासोबतच वाहनखरेदीसाठीही गर्दी होतेय.

close