नाशिकमध्ये पोलिसांचा महिलांवर अमानुष लाठीमार

April 24, 2012 7:46 AM0 commentsViews: 1

24 एप्रिल

नाशिकमधल्या पांढुर्ली गावात पोलिसांनी महिलांवर अमानुष लाठीमार केलाय. तसेच पोलिसांनी घरांची आणि रिक्षांची तोडफोड केल्याचा आरोप होतोय. या ठिकाणी काल दोन गटांमध्ये दंगल झाली होती. त्यानंतर पोलिसांवरही दगडफेक झाल्याने लाठीमार करण्यात आल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. मात्र, पोलिसांनी घरात घुसून मारहाण केल्याच्या लोकांच्या तक्रारी आहेत. त्या ठिकाणी उभ्या असलेल्या रिक्षा पोलिसांनी फोडल्या, दारं फोडून घरातल्या सामानाची नासधूस केली असाही आरोप नागरिक करत आहे. महिला अधिकार्‍यांतर्फे या अत्याचाराची चौकशी सुरू केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

close