कोयना वीज प्रकल्पात उद्या ‘लेक टॅपिंग’

April 24, 2012 2:25 PM0 commentsViews: 7

24 एप्रिल

कोयना वीज प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्यासाठी उद्या लेक टॅपिंग केलं जाणार आहे. धरणातील पाणीसाठी कमी झाल्यावरही धरणातील पाण्याचा उपयोग ऊर्जा निर्मितीसाठी करता यावा यासाठी हे लेक टॅपिंग केलं जाणार आहे. लेक टॅपिंगमध्ये पाण्याखालच्या जमिनीत भूयार खोदून स्फोटकाद्वारे त्या तळ्याला छिद्र पाडलं जातं. आणि त्या बोगद्यातून पाण्याचा प्रवाह वाहता केला जातो. याआधी 1999 साली कोयना धरणात आशिया खंडातीलं पहिलं लेक टॅपिंग करण्यात आलं होतं. आता 13 वर्षानंतर या प्रयोगाची पुनरावृत्ती होतेय. उद्या राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार याच्या उपस्थितीत लेक टॅपिंगचा हा प्रयोग होणार आहे.

close