गोसंवर्धनाच्या जमिनीवर बड्या धेंडाचा कब्जा

April 24, 2012 8:07 AM0 commentsViews: 10

24 एप्रिल

परभणी जिल्ह्यात गोसंवर्धनासाठी आणि अल्प भूधारकासांठी असलेल्या जमिनीवर बड्या धेंडानी कब्जा केल्याचे प्रकरण समोर येतं आहे. माहितीच्या अधिकारात ही बाब स्पष्ट झाली असून या लाभार्थ्यांमध्ये परभणीच्या खासदारांचाही समावेश आहे. परभणी जिल्ह्यात कृषी गोसंवर्धनसाठी जवळपास 400 एकर जागा लीजवर देण्यात आली. अल्पभुधारक शेतकर्‍यांसाठी ही योजना होती. मात्र या जागा दुसर्‍यांनीच बळकावली. माहितीच्या अधिकारातून ही बाब स्पष्ट झाली आहे. या लाभार्थ्यांमध्ये परभणीच्या खासदारांचाही समावेश आहे. 2003 ते 2008 या कालावधीत पाच वर्षाच्या लीजवर जागेचं वाटप झालं होत. शिवसेनेचे खासदार गणेश दुधगावकर यांंच्या ज्ञानोपासक शिक्षण संस्थेनं यापैकी 200 एकर जागा मिळवली. शासनाने 2005 मध्ये लीज करार रद्द केला. मात्र जमिनीवरचा ताबा मात्र आजपर्यंत कुणीच सोडलेला नाही.

माणिक कदम यांनी हे प्रकरण मराठवाडा विकास महामंडळाच्या निदर्शनास आणून दिलं. मात्र आजपर्यंत कारवाई झालेली नाही. मात्र अजूनही जागा सोडायला दूधगावकर तयार नाहीत या प्रकरणी प्रशासन आता काय भूमिका घेतंय यावर सर्वाचं लक्ष लागलंय.

close