दुष्काळग्रस्त भागाला 100 ट्रक चार्‍याची मदत

April 24, 2012 1:41 PM0 commentsViews: 1

24 एप्रिल

सांगली जिल्ह्यातल्या जत आणि आटपाडी तालुक्यात भीषण दुष्काळ पडलाय. पाणी आणि चार्‍याच्या टंचाईमुळे लोकांचे आणि जनावरांचे हाल होत आहे. त्यांच्या मदतीला आता नदीकाठचे शेतकरी दुष्काळग्रस्तांच्या मदतीला धावून आले आहेत. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी 100 ट्रक चारा उपलब्ध करून दिला आहे. हा चारा जत आणि आटपाडीसारख्या दुष्काळग्रस्त भागात वाटण्यात येतोय. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम आणि आमदार प्रकाश शेडगे यांच्या हस्ते आज 56 गावांना चार्‍याचं वाटप करण्यात आलं.

close