लोकसभेत गोंधळ घालणार्‍या 8 खासदारांचे निलंबन

April 24, 2012 10:11 AM0 commentsViews: 2

24 एप्रिल

तेलंगणाच्या मुद्द्यावर आज लोकसभेत खासदारांनी प्रचंड गोंधळ घातला. त्यामुळे गोंधळ घालणार्‍या 8 खासदारांना 4 दिवसांसाठी निलंबित करण्यात आलंय. हे सर्व खासदार तेलंगणा भागातले काँग्रेस खासदार आहेत. पण तरीही या खासदारांनी सभागृहातून बाहेर जायला नकार देत गदारोळ सुरूच ठेवला. अखेर लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. आज सुट्टीनंतर संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून पुन्हा सुरु झालं. पहिल्याच दिवशी स्वतंत्र तेलंगणाच्या मुद्द्यावरुन गदारोळ झाला आणि लोकसभा दुपारपर्यंत तहकूब करण्यात आली. तेलंगणा राष्ट्रीय समितीने आज पुन्हा एकदा स्वतंत्र तेलंगणांची मागणी लावून धरली. संसदेत नेहमी गोंधळ घालणार्‍या तेलंगणातील खासदारांवर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

close