शेतकर्‍यांचं ऑल इज ‘बोअर’वेल !

April 24, 2012 2:51 PM0 commentsViews: 184

24 एप्रिल

बारामती इंदापूर, दौंड हा भाग बागायती पट्टा म्हणून ओळखला जातो. पण या भागातील शेतकरीसुद्धा पाण्यासाठी धास्तावलेला दिसतोय. फळबागा आणि उसाची पिकं जगवण्यासाठी शेतकर्‍यांनी पाणी शोध मोहिम हाती घेतली आहे. त्यामुळे या भागात बोअर घेण्याची जणू काय स्पर्धाच सुरु झाली आहे. या भागात ऊस व फळबागा मोठ्या प्रमाणात आहेत मात्र पाण्याची पातळी खालावू लागल्यामुळे हातातोंडाशी आलेली पिकं जळून जाण्याची भीती आता शेतकर्‍यांना वाटतेय. बोअरवेलच्या वाढत्या मागणीमुळे बोअरवेल व्यावसायिकांची मात्र चंगळ सुरु आहे. एक बोअरवेल मशीन 24 ताासाला किमान 300 फुटांचं बोअरवेल खणतं. तरीही जवळपास आठ दिवस लोकांना त्याची वाट पहावी लागतेय. पण, बोअरवेल काढल्यानंतरही पाणी लागेल की नाही या भीतीने लोक पानाड्याची मदत घेतायेत. त्यामुळे पानाड्यांचीही चंगळ सुरु आहे. आणि नागरिक या पानाड्यांनी सांगितलेल्या जागेवर श्रद्धेनं बोरींग करत आहे.

close