राज्याच्या 6 सदस्यांनी घेतली राज्यसभेच्या खासदारपदाची शपथ

April 24, 2012 8:48 AM0 commentsViews: 3

24 एप्रिल

महाराष्ट्रातल्या सहा सदस्यांनी राज्यसभेच्या खासदारपदाची शपथ घेतली. राजीव शुक्ला वगळता सर्वच सदस्यांनी मराठीतून शपथ घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वंदना चव्हाण, शिवसेनेचे अनिल देसाई, काँग्रेसकडून विलासराव देशमुख, भाजपचे अजय संचेती, काँग्रेसकडून राजीव शुक्ला आणि राष्ट्रवादीचे काँग्रेसचे डी.पी.त्रिपाठी यांनीही मराठीत शपथ घेतली. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी पुण्याचे प्रसिध्द बिल्डर संजय काकडे यांनी आपला अर्ज मागे घेतल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली. यावेळी मात्र शिवसेनेकडून अनिल देसाई यांना उमेदवारी दिल्यामुळे रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली होती.

close