एटीएसकडून मारहाण झाल्याची साध्वीची पुन्हा तक्रार

November 24, 2008 11:51 AM0 commentsViews: 1

24 नोव्हेंबर, मुंबई मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंग हिला मुंबईतल्या मोक्का कोर्टात हजर करण्यात आलं. तिच्यासह सात जणांना कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी साध्वी प्रज्ञासिंग हिनं एटीएसनं आपल्याला मारहाण केल्याची तक्रार कोर्टात केलीय. याशिवाय अश्लील वक्तव्य असलेली सीडी ऐकवण्यात आल्याची तक्रार ही साध्वीनं केली आहे. इतर आरोपी निवृत्त कर्नल रमेश उपाध्याय आणि शिवनारायण सिंग यांनी ही एटीएस पथकानं मारहाण केल्याची तक्रार न्यायालयात केली. साध्वीला न्यायमूतीर्ंनी विचारलं की तू एवढ्या उशिरा तक्रार का केली ? त्यावर साध्वी म्हणाली की मला वेळ मिळाला नाही. साध्वी आणि इतर आरोपींना कोणतीही मारहाण केली नसल्याचं एटीएसनं कोर्टात सांगितलं. दरम्यान, एटीएस पथकानं मारहाण केल्याची तक्रार दुसर्‍यांदा साध्वीनं न्यायालयात केली आहे. दरम्यान, साध्वीसह सात जणांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

close