राष्ट्रपतीपदासाठी हमीद अन्सारींचं नाव पुढे

April 24, 2012 8:56 AM0 commentsViews: 2

24 एप्रिल

राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीला आता वेगळचं वळण लागलंय. डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांचं नाव आपण सुचवलं नाही असं समाजवादी पार्टीने आज स्पष्ट केलंय. त्यामुळे आतापर्यंत अब्दुल कलामांच्या नावाची होणारी चर्चा थंड बस्त्यात जाण्याची शक्यता आहे. तर लालूप्रसाद यादव यांनी हमीद अन्सारींचे नाव पुढं केलं आहे. त्यामुळे आता या नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.

राष्ट्रपतीपदासाठी कोणकोणते दावेदार आहेत ?

हमीद अन्सारी

जमेची बाजू- विद्यमान उपराष्ट्रपती- काँग्रेसची पहिली पसंती

विरोधातली बाजू- लोकपाल विधेयकाच्या वादानंतर भाजपकडून तीव्र विरोधाची शक्यता————————————-

एपीजे अब्दुल कलाम

जमेची बाजू- लोकप्रिय व्यक्तिमत्त्व- सर्वच पक्षांतून पाठिंबा

विरोधातली बाजू- काँग्रेससाठी कलाम एनडीए (NDA) चेच उमेदवार———————————————–

मीरा कुमार

जमेची बाजू- महिला आणि दलित

विरोधातली बाजू- सलग दोन महिला राष्ट्रपती होणं कठीण———————————————–

प्रणव मुखर्जी

जमेची बाजू- सरकार आणि घटनेचा गाढा अनुभव- सर्वच पक्षांत मानाचं स्थान

विरोधातली बाजू- 10 जनपथशी खूप चांगले संबंध नाहीत- यूपीए-2 च्या अडचणी सोडवण्यासाठी पक्षाला गरज———————————————–

गोपाल गांधी

जमेची बाजू- प्रशासकीय सेवेचा मोठा अनुभव- महात्मा गांधींचे पणतू- ममता बॅनजीर्ंचं समर्थन मिळण्याची शक्यता

विरोधातली बाजू- थेट पाठिंबा मिळण्यासारखे व्यक्तिमत्त्व नाही- अपक्ष उमेदवार म्हणूनच स्वीकारण्याची शक्यता जास्त———————————————–गोप्

close