‘आदर्श’च्या अहवालाविरोधात लष्कर सुप्रीम कोर्टात जाणार’

April 24, 2012 9:17 AM0 commentsViews: 4

24 एप्रिल

आदर्श प्रकरणी न्यायालयीन आयोगानं दिलेला अहवाल लष्कराला मान्य नाही, याविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचं लष्कराचे वकील अनिक निकम यांनी सांगितलं. तसेच आयोगाने लष्कराच्या अनेक युक्तीवादांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही अनिकेत निकम यांनी केला. तीन निवृत्त न्यायाधीशांच्या आयोगाच्या समितीने मागिल आठवड्यात आपला अहवाल सादर केला. या अहवालात आदर्शची जमीन राज्य सरकारचीच आहे असं स्पष्ट झालंय. ही जागा लष्करासाठी नव्हतीच असंही यात सांगण्यात आलंय. त्यामुळे एकाप्रकारे काँग्रेससरकारला या अहवालामुळे मोठा दिलासा मिळाला. पण आता या अहवालाच्या विरोधात लष्कारने कोर्टात जाण्याचे ठरवले आहे.

close