डिझेल दरवाढीला राष्ट्रवादीचा विरोध

April 25, 2012 9:39 AM0 commentsViews: 4

25 एप्रिल

डिझेल, खत आणि वीजेच दर वाढवण्याला राष्ट्रवादीचा विरोध केला आहे. राष्ट्रवादीचे राज्यसभेचे खासदार डी पी त्रिपाठी यांनीच ही माहिती दिली. डिझेलचे दर वाढवण्याला यूपीएचा सहकारी पक्ष तृणमूल काँग्रेसनंही विरोध केला होता. आता डिझेल, खत आणि वीज दर वाढवण्यास राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध दर्शवला आहे. या पूर्वी तृणमूल काँग्रेसने डिझेल नियंत्रण मुक्त करण्यास विरोध केला होता. शेतकर्‍यांच्या विविध मागण्यासाठी राष्ट्रवादीने 16 मेला दिल्लीत एका रॅलीचं आयोजन केलं आहे असं डी पी त्रिपाठी यांनी सांगितलं.

close