दिवा स्टेशन परिसरात गोळीबार, एक ठार

April 24, 2012 11:21 AM0 commentsViews: 28

24 एप्रिल

ठाण्यातील दिवा परिसरामध्ये रेल्वे स्थानक परिसरात दोन जुळ्या भावांवर पूर्ववैमन्यसातून गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. स्मित म्हात्रे आणि अमित म्हात्रे आपल्या वाहनातून दिवा रेल्वे फाटक ओलांडत असताना झालेल्या वादातून आरोपी ब्रह्मा म्हात्रे याने आपल्याकडील पिस्तूल मधून दोन गोळ्या घातल्या त्यात स्मित म्हात्रे याला छातीत गोळी लागल्याने तो मृत्यूमुखी पडला. तर त्याचा जखमी भाऊ अमित म्हात्रे याला दिव्यातील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रेल्वे पोलिसांनी आरोपी ब्रह्मा म्हात्रे याला ताब्यात घेतले असून याबाबत पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

close