अतिक्रमण हटवताना इमारत कोसळून 2 जणांचा मृत्यू

April 25, 2012 10:15 AM0 commentsViews: 6

25 एप्रिल

औरंगाबाद शहरातील शहागंज भागामध्ये अतिक्रमण हटवताना इमारत कोसळून 2 जणांचा मृत्यू झाला आहे. आज अतिक्रमण हटावा पथकाने आज शहरातील शहागंज भागात कारवाई केली यावेळी एक तीन मजली इमारत भूईसपाट करत असताना त्याखाली तीन जण अडकले गेले. यापैकी एकाला बाहेर काढण्यात यश आलंय. पण एकाच मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त जमावाने पोलीस आणि अतिक्रमण हटाव पथकांवर दगडफेक केली. पोलीस आणि जेसीबी वाहनांची तोडफोड करीत जमावाने संताप व्यक्त केला. गेल्या 3 दिवसांपासून औरंगपुरा, शहागंज भागामध्ये असलेल्या भाजीमंडई, मार्केटच्या अतिक्रमण हटावाला विरोध करण्यात आला होता. मात्र रस्ता रुंदीकरणासाठी महापालिकेनी ही मोहिम तशीच सुरु ठेवली. आज विरोध सुरु असताना अतिक्रमण हटवण्याचे काम सुरु होते.

close