सुवर्णगणेश मूर्ती चोरीप्रकरणी चौघांना पोलीस कोठडी

April 25, 2012 11:37 AM0 commentsViews: 1

25 एप्रिल

दिवेआगरच्या सुवर्णगणेश मूर्ती चोरी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींना कोर्टाने 12 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पण संतापलेल्या गणेशभक्तांनी कोर्टाच्या आवारातच आरोपीला चोप द्यायचा प्रयत्न केला. काल मंगळवारी अहमदनगरच्या घोसपुरी गावातून या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुणे क्राईम ब्रँचने अहमदनगर पोलिसांच्या मदतीने एक महिन्यानंतर त्यांना जेरबंद केलंय. आरोपींनी चोरीची कबुलीही दिली. पण सोन्याचा मुखवटा कुठे आहे, याबद्दल पोलीस किंवा सरकारी वकील ऑन रेकॉर्ड बोलायला तयार नाही.

दरम्यान, तब्बल एक महिन्यानंतर चोरटे सापडल्याने दिवेआगरमध्ये आनंद पसरलाय. तब्बल 32 दिवसांनंतर इथल्या गणेश मंदिरात आरती करण्यात आली. सुवर्णगणेशाच्या चोरीनंतर दिवेआगरमधल्या भाविकांची संख्या घटली होती आणि व्यवसायही ठप्प झाला होता. आता स्थिती पुन्हा एकदा पहिल्यासारखी होईल, असा विश्वास इथल्या व्यावसायिकांना वाटतोय. झाल्या प्रकारानंतर आता मंदिरातली सुरक्षा वाढवली जावी, अशी मागणी होतेय. चोरट्यांना मदत करणार्‍या सोनारांचाही तपास पोलीस करत आहे. पण अंबेजोगाईच्या योगेश्वरी मंदिरातल्या लुटारूंचा अजून थांगपत्ताही लागला नाही.

close