पुण्यात राष्ट्रपतींच्या घराविरोधात स्वाक्षरी मोहीम

April 25, 2012 11:53 AM0 commentsViews: 2

25 एप्रिल

पुण्यातील राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या घराला विरोध वाढत चालला आहे. निवृत्त कर्नल सुरेश पाटील यांनी याविरोधात आजपासून सह्यांची मोहीम हाती घेतली आहेत. राष्ट्रपती निवृत्त झाल्यानंतर राष्ट्रपतींना पुण्यात घरासाठी नियमापेक्षा जादा जमीन देण्यात आल्याचा आरोप सुरेश पाटील यांनी केला आहे. तसेच त्रिपुराचे राज्यपला डी.वाय. पाटील यांनी आपल्यावर आंदोलन मागे घेण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोपही सुरेश पाटील यांनी नुकताच केला आहे. आंदोलनमागे घेण्यात यावे यासाठी त्रिपुराचे राज्यपाल डी वाय पाटील यांनी विनंती केली होती. पण पाटील यांनी विनंती फेटाळून लावत आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचं स्पष्ट केलंय.

close