‘मिस्टर इंडिया’ 3डी मध्ये

April 25, 2012 2:05 PM0 commentsViews: 6

25 एप्रिल

अनिल कपूर आणि श्रीदेवी यांच्या मिस्टर इंडियाची जादू आजही कायम आहे. आणि आता त्यात भर पडणार आहे ती 3 डी मिस्टर इंडियाची. मिस्टर इंडिया 3 डी मध्ये बनणार आहे. 2014 ला हा सिनेमा रिलीज होणार आहे. अनिल कपूर आणि श्रीदेवीचा रोमान्स, मिस्टर इंडियाचं अदृश्य असणं, 'मोगॅम्बो खूष हुवा' हे आजही पॉप्युलर आहे. या 3 डी सिक्वलमध्ये बोनी कपूरचा मुलगा अर्जुन कपूर असेल. श्रीदेवी आणि अनिल कपूरची जोडी पुन्हा एकदा पाहायला मिळेल. आणि व्हिलनसाठी सलमान खानच्या नावाची चर्चा आहे. या सिनेमाचं बजेट 150 कोटींचं आहे. सिनेमाला संगीत ए.आर. रेहमानचं असणार आहे.

close