गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी केली 2 गावकर्‍यांची हत्या

April 26, 2012 2:34 PM0 commentsViews: 1

26 एप्रिल

गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा गरीब शेतकर्‍यांवर हल्ला चढवलाय. मरके गावात आज सकाळी नक्षलवाद्यांनी 10 गावकर्‍यांचे अपहरण केले. त्यांना अज्ञातस्थळी घेऊन गेले. यानंतर या दहा शेतकर्‍यांपैकी दोघांना गोळा घालून ठार मारले. देवदास उसेंडी आणि राम नरोटे अशी या गावकर्‍यांची नावं आहेत. हे सर्व गावकरी मरके गावाचे रहिवासी आहेत. नक्षलवाद्यांच्या या अपहरणामुळे गडचिरोलीत एकच खळबळ उडाली आहे. मागिल महिन्यात नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोेट घडवून जवानांनी भरलेली बस उडवली होती. या घटनेत 16 जवान शहीद झालेत. महिनाभर उलट नाही तोच नक्षलवाद्यांनी पुन्हा डोकंवर काढलंय.

close