राहुल गांधी करणार दुष्काळग्रस्त भागाची पाहणी

April 26, 2012 2:46 PM0 commentsViews: 3

26 एप्रिल

काँग्रेसचे युवराज आणि सरचिटणीस राहुल गांधी महाराष्ट्राच्या दौर्‍यावर येणार आहेत. या दौर्‍यात राहुल गांधी महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करणार आहे. दोन दिवसांनी म्हणजे 28 तारखेला राहुल गांधी सातारा जिल्ह्यातल्या दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. राज्यात सध्या दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक भागात पिण्याचे पाणी सुध्दा उपलब्ध होत नाहीये. अनेकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी अलीकडे केंद्रातील दोन सदस्यीय समिती पाहणी करुन गेले. सध्याची परिस्थिती पाहुन सदस्यांना चांगलाच घाम फुटला. आता खुद्द काँग्रेसचे युवराज राहुल गांधी पाहणी करण्यासाठी येणार आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त भागांसाठी काय उपाययोजना जाहीर करताय याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

close