मुंबई विद्यापीठाचा पुन्हा गलथान कारभार

April 25, 2012 2:54 PM0 commentsViews: 1

25 एप्रिल

मुंबई विद्यापीठात पुन्हा एकदा पेपर फुटी झाल्याचं समोर आलं आहे. आज बीएमएसचा पेपर फुटला त्यामुळे ऐनवेळी प्रश्नपत्रिका बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यामुळे आज बीएमएस चा पेपर दीड तासानंतर सुरु झाला. मात्र विद्यापीठाने पेपर फुटलाच नाही, असा आधी दावा केला. पण नंतर चौकशीसाठी 3 सदस्यांची समिती नेमली आहे. या समिती प्रा. एस.टी गडदे, प्रकाश वाणी आणि दिनेश संजीवन हे या समितीत असतील. इंटरनेटच्या माधमातून हा पेपर 49 परीक्षा केंद्रांवर पाठवण्यात आला होता. पण पेपर पाठवण्यास उशीर झाल्याने पेपरला उशीर झाल्याचा दावा मुंबई विद्यापीठाच्या परिक्षा विभागाचे संचालक सुभाष देव यांनी केला.

close