मनसे लोकसभा निवडणूक लढवणार- राज ठाकरे

November 24, 2008 12:00 PM0 commentsViews: 3

24 नोव्हेंबर, मुंबईविनोद तळेकर महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा लढवेल, असं मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर केलंय. माटुंग्याच्या षण्मुखानंद हॉलमध्ये मनसेच्या मुंबई, पुणे, ठाणे आणि नाशिकच्या पदाधिकार्‍यांची बैठक झाली. या बैठकीत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना उठा आणि कामाला लागा, असा आदेश दिला आहे. राज्यातल्या 48 खासदारांपैकी एकानंही मराठीची बाजू उचलून धरलेली नाही. पण ओरिसाचे खासदार या विषयावर माझ्या बाजूनं बोलले, असंही राज यावेळी म्हणाले. भूमिपुत्रांना नोकरीत 80 टक्के जागा देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाची यावेळी त्यांनी खिल्ली उडवली.

close