‘यंदा 104 टक्के पाऊस होणार’

April 26, 2012 3:02 PM0 commentsViews: 7

26 एप्रिल

उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच राज्यात निर्माण झालेल्या 'पाणी'बाणी मुळे हैराण झालेल्या बळीराज्यासाठी एक चांगली बातमी. यंदा चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री विलासराव देशमुख यांनी नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. यंदा 99 ते 104 टक्के पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जूनच्या सुरुवातील मान्सून केरळाला लवकर धडकणार अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आलीय. आता खरंच इतका दमदार पाऊस झाला तर बळीराजासाठी नक्कीच मोठी फायद्याची बाजू ठरणार आहे.

close