फिरोदिया करंडक स्पर्धेत एमआयटीची बाजी

April 26, 2012 3:32 PM0 commentsViews: 3

26 एप्रिल

पुण्याच्या कॉलेज लाईफमध्ये महत्वाच्या मानल्या जाणार्‍या फिरोदिया करंडक स्पर्धेचा पारितोषिक समारंभ तरूणाईच्या जल्लोषात पार पडला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते विजेत्यांना गौरवण्यात आलं. यात एमआयटी (MIT) इंजिनिअरिंग कॉलेजने पहिला तर सीओईपी (COEP)नं दुसरा क्रमांक मिळवला. दोन्ही एकांकिका काल सादर करण्यात आल्या. नाटक, डान्स. शिल्प कला, चित्रकला अशा सर्व परफॉर्मिंग आर्टसचे धमाल मिश्रण करून एकांकिका सादर करायची ही थीम असते फिरोदिया करंडक स्पर्धेची. यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा कस लागतो. आयबीएन लोकमत या स्पर्धेचा मीडिया पार्टनर आहे. यावेळी पुरस्कार विजेत्या एकां्‌कका काही प्रसिद्ध अभिनेते, निर्मात्यांना दाखवणार असल्याचे आश्वासन राज ठाकरेंनी दिलं.

close