युवराजची मैदानावर एंट्री

April 26, 2012 4:47 PM0 commentsViews: 2

26 एप्रिल

पुणे वॉरियर्स टीमला पाठिंबा देण्यासाठी आज युवराज सिंग स्वत: मैदानात हजर आहे. तब्बल चार महिन्यानंतर युवराजने मैदानावर पाऊल टाकले आहे. युवराजसाठी आजचा दिवस नवा नसला तरी कँन्सर सोबत दोन हात करुन आलेल्या युवीची आजची मैदानावरची एंट्री त्याचासाठी विशेष आहे. आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी युवी आपल्या टीमची जर्सी घालून खेळाडून सोबत मिसळून गेला आहे. आयपीएलच्या चौथ्या हंगामात युवराज सिंगने पुणे टीमचे कॅप्टनपद सांभाळलं होतं. त्याच्या नेतृत्वाखाली टीमने चांगली कामगिरी केली होती. पण कॅन्सरवरच्या उपचारानंतर युवराज सिंग सध्या क्रिकेटपासून दूर आहे. त्यामुळे या हंगामात तो खेळू शकला नाही. पण टीमला चिअर अप करण्यासाठी आज तो पुण्यात आला आहे. मागिल महिन्यातच अमेरिकेत तीन महिने उपचार घेऊन युवी मायदेशी परतला आहे. डॉक्टरांनी युवीला क्रिकेटपासून काही महिने दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, युवी ऑक्टोबर महिन्यापर्यंत पूर्ण बरा होऊन मैदानावर उतरेल अशी आशा डॉक्टरांना आहे.

close