ओरिसात अपहरत आमदारांची उद्या सुटका

April 25, 2012 5:02 PM0 commentsViews: 4

25 एप्रिल

ओरिसामध्ये महिनाभरापासून नक्षलवाद्यांनी अपहरण केलेल्या बिजू जनता दलाच्या आमदाराची अखेर उद्या सुटका होणार आहे. उद्या सकाळी दहा वाजता त्यांची सुटका करणार असल्याचे नक्षलवाद्यांनी सांगितले आहे. पण सुटका झाल्यावर आमदार जिना हिकाका यांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे. नक्षलवाद्यांच्या प्रजा कोर्टात हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, छत्तीसगडमधून अपहरण करण्यात जिल्हाधिकारी ऍलेक्स पॉल मेनन यांच्या सुटकेच्या वाटाघाटीसाठी नक्षलवाद्यांनी मुदत वाढवून दिली. ऍलेक्स यांची प्रकृती ढासळल्याने सर्वांनाच चिंता लागून आहे.

close