पाण्यासाठी बळी गेल्यानंतर सरकारची धावाधाव

April 26, 2012 5:03 PM0 commentsViews: 1

26 एप्रिल

मोखाडा तालुक्यातल्या डोलारा गावात पाण्यासाठी महिलेचा बळी गेल्यावर राज्य सरकारला जाग आली आहे. आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावीत यांनी पार्वती जाधव या महिलेच्या कुटुंबीयांची भेट घेतली, तर पाणी पुरवठा मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी तातडीची आढावा बैठक घेतली. विशेष म्हणजे जव्हार, मोखाडा आणि विक्रमगड या ठाणे जिल्ह्यातल्या तालुक्यांमध्ये तीव्र पाणी टंचाई असून शासनाने जाहीर केलेल्या टंचाईग्रस्त तालुक्यांच्या यादीत यांचा समावेशच नाही. डोलारे सारख्या गावात फक्त यंदाच नाही तर गेल्या कित्येक वर्षांपासून पाण्याची टंचाई आहे, पाणी पुरवठ्याची एकही योजना नाही. याचा आढावा घेऊन तातडीने पाणीपुरवठा योजनांची आखणी करण्यात आली. उदासीन अधिकार्‍यांची यावेळी कानउघडणी करण्यात आली.

close