मध्य रेल्वेचा पुन्हा खोळंबा,प्रवाशांचे हाल

April 26, 2012 5:45 PM0 commentsViews: 2

26 एप्रिल

मुंबईत पुन्हा एकदा मध्य रेल्वेचा खोळंबा झाला आहे. ऐन गर्दीच्या वेळी विठ्ठलवाडी स्टेशनवर लोकल बंद पडल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आणि नेहमीच्या या त्रासाने प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक झाला. अंबरनाथ स्टेशनवर संतप्त प्रवाशांनी लोकलवर दगडफेक केली. ट्रॅकवर काही लोकल आणि एक्सप्रेस एका पाठोपाठ एक अडकल्या होत्या.अनेकांनी तर ट्रॅकवरुन पायी जाणं पसंत केलं. डोंबिवलीपासून पुढे कर्जतआणि कसार्‍यापर्यंत प्रवास करणार्‍या प्रवाशांना कायम हा त्रास सहन करावा लागतो. हा त्रास थांबणार कधी असा सवाल हे प्रवासी विचारत आहे.

close